उन्हाळा सुरू झाला की एअर कूलर हा स्वस्त आणि प्रभावी पर्याय वाटतो. पण योग्य काळजी घेतली नाही तर कूलर थंड हवा देण्याऐवजी गरम हवेचा फुगा बनू शकतो. सुरुवातीला थंडगार वाटणारा कूलर काही दिवसांतच गरम हवा का देतो, याचा विचार केला आहे का? त्यामागे लपलेल्या ५ मोठ्या चुका ओळखून, तुम्हीही कूलरमधून जास्तीत जास्त थंडावा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया!
कूलरमध्ये पाणी कमी पडणे
कूलरची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याच्या पॅड्सना मिळणारे भरपूर पाणी. जर पाणी कमी असेल, तर पॅड्स नीट ओले होत नाहीत आणि फक्त गरम हवा बाहेर येते. थंडाव्याऐवजी खोली उष्ण बनते.
उपाय:
कूलरची टाकी वेळच्यावेळी पाण्याने भरा.
अधिक गार हवा हवी असल्यास थंड पाणी किंवा थोडासा बर्फ टाका यामुळे थंडावा झपाट्याने वाढतो.
एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ 4 शहरात तयार होणार नवीन बस स्थानक
कूलर चुकीच्या ठिकाणी ठेवणे
कूलर कोणत्याही जागी ठेवला तरी हवा मिळेल, हा गैरसमज सोडून द्या! कूलर जर ताजी हवा न येणाऱ्या ठिकाणी ठेवला, तर तो गरम हवा फेकतो आणि खोलीत उष्णता वाढते.
उपाय:
कूलर नेहमी खिडकी किंवा दरवाज्याजवळ ठेवा, जेणेकरून ताजी हवा आत येईल आणि गरम हवा बाहेर पडेल.
कूलिंग पॅड्सची स्वच्छता दुर्लक्षित करणे
कूलिंग पॅड्स धूळकट आणि घाण झाल्यास त्यांची पाणी शोषण्याची क्षमता कमी होते. परिणामी कूलर थंड हवा देण्याऐवजी गरम वाऱ्याचा झोत मारतो.
उपाय:
दर १५-२० दिवसांनी पॅड्स स्वच्छ करा.
गरज असेल तर जुने पॅड्स बदलून नवीन टाका.
जास्त उष्णतेत कूलर चालू ठेवणे, पण थंड पाणी न वापरणे
तापमान प्रचंड वाढल्यावर बाहेरून येणारी हवा अधिक गरम असते. अशा वेळी कूलरमध्ये थंड पाणी किंवा बर्फ न टाकल्यास तो गरम हवा फेकायला लागतो.
उपाय:
उन्हाचा कडाका वाढल्यावर कूलरच्या टाकीत थंड पाणी किंवा बर्फ जरूर टाका. काही कूलरमध्ये बर्फसाठी खास ट्रे असतात, त्याचा फायदा घ्या.
खोलीत योग्य हवेचा प्रवाह नसणे
कूलर चालू ठेवताना सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद केल्याने हवा फिरत नाही, आणि कूलरच्या गार हवेपेक्षा गरम हवेचा साठा तयार होतो.
उपाय:
कमीतकमी एक खिडकी किंवा दरवाजा थोडासा उघडा ठेवा, जेणेकरून गरम हवा बाहेर जाईल आणि ताजी हवा आत येईल.
थंड गारवा मिळवायचा? मग हे लक्षात ठेवा!
- कूलरची टाकी नेहमी भरलेली ठेवा.
- कूलरची जागा खिडकी किंवा दरवाज्याजवळ असू द्या.
- कूलिंग पॅड्स स्वच्छ ठेवा आणि गरजेनुसार बदला.
- जास्त गरमीच्या वेळी बर्फ किंवा थंड पाणी वापरा.
- खोलीत हवेचा मोकळा प्रवाह ठेवा.