महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने कामगारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. श्रम आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही मोठी घोषणा विधानसभेत केली.
बांधकाम कामगारांसाठी नवीन निवृत्ती वेतन योजना
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक आधारासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांना ही योजना लागू होणार आहे. मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केलं की, केंद्र सरकारने 1996 साली लागू केलेल्या कायद्याच्या आधारावर महाराष्ट्राने 2007 मध्ये नियम तयार केले. त्याअंतर्गत 2011 साली बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली.
ST discount for women: एसटी प्रवासात महिलांना मिळणार मोठी सवलत आनंदाची बातमी
योग्यता आणि लाभाचे टप्पे:
- 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्ती वेतन:
- 10 वर्षे नोंदणी पूर्ण झाल्यास प्रतिवर्षी 6,000 रुपये (50% वेतन) मिळेल.
- 15 वर्षे नोंदणी पूर्ण झाल्यास प्रतिवर्षी 9,000 रुपये (75% वेतन) मिळेल.
- 20 वर्षे नोंदणी पूर्ण झाल्यास प्रतिवर्षी 12,000 रुपये (100% वेतन) मिळेल.
- 58 लाख नोंदणीकृत कामगारांना फायदा:
- सध्या नोंदणीकृत असलेल्या 58 लाख कामगार कुटुंबांना आणि यापुढे नोंदणी होणाऱ्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कामगारांसाठी भविष्याची हमी
या निर्णयामुळे कामगारांच्या कुटुंबांचे आर्थिक भविष्य सुरक्षित होणार आहे. आयुष्यभर राबणाऱ्या बांधकाम कामगारांना आता निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल आणि त्यांना आत्मसन्मानाने जीवन जगता येईल.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले की, “ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून, त्यांना दिलेली एक आर्थिक सुरक्षिततेची हमी आहे. कामगारांची मेहनत आणि त्यांचं योगदान याची सरकारला जाणीव आहे, आणि त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.”
महाराष्ट्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना निवृत्तीचं नवे उजाळे मिळणार आहेत. हे पाऊल कामगारांसाठी नवा आशेचा किरण ठरणार आहे!