राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेच्या मर्यादेत वाढ करून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा तीन लाख रुपये होती, पण आता ती वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
किसान क्रेडिट कार्डचा फायदा
– पीक खरेदीसाठी कर्ज – बियाणं, खते, कीटकनाशके यासाठी वापर करता येईल.
– शेतीविषयक खर्चासाठी मदत – हवामानामुळे नुकसान झाल्यास मदत मिळेल.
– मत्स्यपालन, पशूपालनासाठीही उपलब्ध – 2019 पासून या क्षेत्रांनाही समाविष्ट करण्यात आले आहे.
– 31 डिसेंबर 2024 पर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्यात आलं.
Ladaki bahin April installment: या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये भेटणार सरकारचा मोठा निर्णय
KCC कसे मिळवायचे?
1. बँकेत अर्ज करा – जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा को-ऑपरेटिव्ह बँकेत अर्ज सादर करा.
2. आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, जमीन नोंदणी कागदपत्रे, शेती संबंधित माहिती.
3. पात्रता– शेतकरी किंवा मत्स्यपालक असणे आवश्यक.
4. कर्जाची मंजुरी – पात्र ठरल्यास थेट खात्यात पैसे जमा होतील.
महत्त्वाचे बदल
– कृषी मंत्रालयाचं बजेट 275% कमी, आता 1.37 लाख कोटी.
– मत्स्यपालन, पशूपालन आणि डेअरीसाठी 7544 कोटींची वाढ.
– अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 4364 कोटींचा निधी.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. KCC च्या माध्यमातून आता अधिक कर्ज, अधिक संधी आणि अधिक उत्पादन शक्य होणार आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या!