1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? land records

land records जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं खूप गरजेचं असतं. मूळ जमीन कुणाची होती, काळानुसार त्यात काय बदल झाले – ही माहिती पूर्वी फक्त तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयातूनच मिळायची.

पण आता महाराष्ट्र सरकारनं ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. याआधी ही सोय फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. मात्र आता राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये नागरिकांना घरबसल्या जुने अभिलेख पाहता येणार आहेत.

यात अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. land records

इतकं महाग सोनं कधी पाहिलं आहे का? दसऱ्यापूर्वी विक्रमी झेप : gold price today record breaking rise in gold prices

काय आहे ई-अभिलेख योजना?

“ई-अभिलेख” या उपक्रमांतर्गत सरकार तब्बल 30 कोटी जुने अभिलेख उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे सातबारा, फेरफार, खाते उतारे यासारखे महत्वाचे कागदपत्रे आता सहज डाऊनलोड करता येतील. land records

जुने अभिलेख कसे पाहायचे?

तुम्हाला जुने अभिलेख पाहायचे असतील तर ही सोपी प्रक्रिया फॉलो करा 👇

  1. सगळ्यात आधी 👉 aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

  2. महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट उघडेल. तिथं “e-Records (Archived Documents)” या पेजवर जा.

  3. उजव्या बाजूला असलेल्या “Language” पर्यायातून मराठी निवडा.

  4. जर आधीच नोंदणी केली असेल तर लॉग-इन करा. नसेल तर “नवीन वापरकर्ता नोंदणी” वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा.

रजिस्ट्रेशन कसं करायचं?

फॉर्म भरताना तुमचं नाव, आडनाव, जेंडर, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, पत्ता इत्यादी माहिती द्यावी लागेल. शेवटी एक लॉग-इन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं अकाउंट तयार होईल.

अभिलेख कसा शोधायचा?

  • लॉग-इन झाल्यावर जिल्हा, तालुका, गाव आणि “अभिलेख प्रकार” निवडा.

  • उदाहरणार्थ, तुम्हाला फेरफार उतारा पाहायचा असेल तर “फेरफार” निवडा.

  • गट क्रमांक टाका आणि “शोधा” बटण दाबा.

  • त्यानंतर संबंधित वर्षाचा फेरफार, सातबारा किंवा इतर अभिलेख स्क्रीनवर दिसेल.

  • पाहिजे असलेला उतारा निवडा आणि डाउनलोड करून सेव्ह करा.

यामुळे काय फायदा होणार?

  • शेतकरी आणि नागरिकांना तहसिलच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
  •  जुन्या जमिनीच्या मालकीबाबत पारदर्शक माहिती सहज मिळेल.
  •  व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. land records

Leave a Comment